वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६
प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त

वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले.
मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.यांचे कुटुंबातील  आई - वडील, सासू-सासरे,भाऊ व इतर पाटील व बारसागडे परिवारातील सर्व सदस्य तसेच मुलगा आयुष  अद्वित , जीवक वाचनालयातील सर्व सदस्य,किटाडी(तुकुम)ता. चिमूर गावातील नागरिक व मित्रपरिवार या सर्वांनी आनंद व्यक्त केला. वरील संशोधन चंद्रपूर जिल्ह्यातील अंध, अपंग, विधवा व निराधार ,समाजातील दुर्लक्षित घटक यांच्या जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न आणि त्यावर उपाययोजना, सुचना व शिफारशी या संशोधनांमध्ये करण्यात आलेला आहे. याबद्दल  डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान,महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे व सर्व प्राध्यापक,आनंद निकेतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरोरा येथील  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे व सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंबातील सर्व व्यक्ती आणि मित्रमंडळींनी अभिनंदन केले.

Comments