वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

रेती घाटाचे शिल्लक पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकांवर हल्ला. दोन गटात तुडुंब हाणामारीत युवकाचा मृत्यू .घटनास्थळी पोलीस दाखल पोलिसांचा तपास सुरू

रेती घाटाचे शिल्लक पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकांवर हल्ला. 
दोन गटात तुडुंब हाणामारीत युवकाचा मृत्यू .

घटनास्थळी पोलीस दाखल पोलिसांचा तपास सुरू 

. वरोरा (जि. चंद्रपूर), दि. २ मार्च: तालुक्यातील बामर्डा येथील वणा नदीच्या रेती घाटावर पैशांच्या वादातून एका ४० वर्षीय युवकाचा तलवारीने वार करून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी ८.०० वाजताच्या सुमारास घडकीस आली. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी चार महागड्या गाड्यांची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हिंगणघाट येथील रहिवासी आणि रेती वाहतूक व्यावसायिक अमोल मधुकर ठोंबरे यांनी याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भरत दयानंद नागपाल (रा. पुलगाव, ता. वरोरा) असे मृत वाळू व्यवसाईकाचे नाव आहे.

फिर्यादीनुसार, ठोंबरे आणि त्यांचे साथीदार यांनी गितेश सातपुते यांच्याकडून बामर्डा येथील वणा नदीचा रेती घाट सुमारे २ कोटी ५ लाख रुपयांना खरेदी केला होता. मात्र, सातपुते यांनी जानेवारीमध्ये घाट परत घेतला आणि उर्वरित ९८.६४ लाख रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत परत करण्याचे आश्वासन दिले. पैसे न मिळाल्याने ठोंबरे व इतर भागीदार रविवारी सायंकाळी७.०० वाजताच्या सुमारास मालकाकडे पैशांची मागणी करण्यासाठी बामर्डा घाटात गेले होते.

घाटावर पोहोचल्यानंतर गितेश सातपुते यांच्या आदेशाने दिवाणजी आणि पोकलॅन्ड चालकांनी दोन्ही रस्त्यांवर पोकलॅन्ड मशीन आडव्या लावून त्यांच्या गाड्यांना अडवले. काही वेळातच अमोल कामडी, अक्षय खडसे, सौरभ ठाकुर यांच्यासह इतर सात-आठ जण तलवारी, लोखंडी दांडे आणि रॉड्स घेऊन तेथे दाखल झाले.

आरोपी सौरभ ठाकुर याने फिर्यादी अमोल ठोंबरे यांच्यावर तलवारीने वार केला. हा वार डोक्याखाली लागल्याने ते जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या भरत नागपाल यांच्या डोक्यात सौरभने तलवारीने जोरदार वार केला. गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपींनी भरत नागपाल यांना नदीच्या खोल पात्रात फेकून दिले. जिवाच्या भीतीने अन्य साथीदार पळून गेल्याने भरत यांना वाचविणे शक्य झाले नाही.

आरोपींनी यानंतर चारही गाड्यांची तोडफोड करून त्यांना आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना येण्याची माहिती मिळताच ते फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक पोहणाऱ्याच्या मदतीने भरत नागपाल यांना नदीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वरोरा पोलिसांनी अमोल कामडी, अक्षय खडसे, सौरभ ठाकुर, सुनील झोरे, प्रफुल उमाटे, अतुल मोटघरे यांच्यासह पोकलॅन्ड चालक आणि दिवाणजी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
....................

Comments