वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली.
मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून राखी यांच्यावर दोन वार केले. यावेळी राखी यांचे पती अजय हे घरातच उपस्थित होते.

राखी यांच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राखी यांना शेजाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

या प्रकरणी अजय लिहितकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात विक्की बावणे याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १०९ (१) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments