वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पोलिस बाथरूम मधून पॉक्सो आरोपीचे पलायन; मदत करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

पोलिस बाथरूम मधून पॉक्सो आरोपीचे पलायन; पळविण्यास मदत करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

वरोरा, दि. 26 मार्च – पॉक्सो प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलिस स्टेशनच्या अटकेतील रखवालीतून पळवून नेण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला सुटका करून देणाऱ्या दोघा साथीदारांवर वरोरा पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिस स्टेशन वरोरा येथील अपराध क्रमांक ३९४/२०२६ अन्वये कलम १३७, ६४(२)(आय), ४९ भा.न्या.सहिता सह कलम ४, ६, १७ पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुमित गुरुदास देवाळकर याने एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळ असलेल्या तिलकराज लॉजचे मालक तिलक सुभाषराव येरगुळे (वय ३३, रा. वणी) व लॉज मॅनेजर निलेश कवडु अहीरकर (वय ३३, रा. चरुरुखटी) यांचा सहभाग निदर्शनास आल्याने त्यांना २४ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. अटकेची सूचना त्यांच्या मित्रांना देण्यात आली होती.
अटक केल्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास दोन्ही आरोपींची बयाने नोंदविण्याचे काम सुरू असताना अचानक आरोपी तिलक येरगुळेचे मित्र निलेश चरणदास लांडगे (वय ३५, रा. बोर्डा) व शुभम बंशी आसकर (वय २६, रा. ब्राद्रा) हे पोलिसांच्या कार्यालयात आले. निलेश लांडगे याने फोटो मागण्याच्या बहाण्याने आरोपीला जवळ बोलावून त्याच्याशी गुपचूप संवाद साधला. त्यानंतर आरोपीने स्वतःला बाथरूममध्ये जाण्यासाठी विनंती केली व त्या ठिकाणावरून फरार झाले. पोलिसांनी तपासणी केली असता आरोपी तेथून फरार झाल्याचे लक्षात आले.

पोलिस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे उघडकीस आले की, शुभम आसकर याने आरोपीला पोलिस स्टेशनच्या मागून पळवून लावले. त्यानंतर स्टेशनच्या बाहेर लावलेली स्वतःची मोटरसायकल (क्र. MH ३४ BY ०७३९) घेऊन आरोपीला ती दिली आणि त्याला कायदेशीर रखवालीतून पळून जाण्यास मदत केली.

या प्रकरणी मपोउपनि सुमित्रा हागरुजी साखरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तिलक येरगुळे व त्याला मदत करणारे निलेश लांडगे व शुभम आसकर यांच्याविरुद्ध कलम २६२, २६३, ६१ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून पोलिसांनी दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
..........

Comments