1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वरोरा येथे दारूच्या नशेत मोटरसायकलस्वाराने सायकलला धडक दिली; वृद्ध गंभीर जखमी


वरोरा येथे दारूच्या नशेत मोटरसायकलस्वाराने सायकलला धडक दिली; वृद्ध गंभीर जखमी

वरोरा, दि. २४ मार्च – येथील मजरा ते येन्सा दरम्यान चंद्रपुर-नागपूर महामार्गावर दारूच्या नशेत मोटरसायकल चालविणाऱ्या तरुणाने सायकलस्वाराला मागून धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या मुलाने याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, नसरुद्दीन अंसारी (वय साधारण ६०) हे आदित्य जिनींग येथे चौकीदार म्हणून काम करतात. २४ मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ते सायकलने ड्युटीवर जात असताना मजरा व येन्सा यांच्यादरम्यान बंद पडलेल्या व्हिडीओकॉन कंपनीजवळ मागून येणाऱ्या मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते सायकलवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्यासह दोन्ही हात, पाय व खांद्याला गंभीर दुखापत झाली.

मोटरसायकलस्वार आदित्य अरविंद मत्ते (वय २२, रा. किलोनी) हा देखील या अपघातात जखमी झाला. तक्रारदार शाहिस्ता नसरुद्दीन अंसारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर उपचारासाठी आणलेल्या आरोपीला विचारले असता तो मोठ्या प्रमाणात दारू प्यायल्यामुळे अडखळत बोलत होता. त्याच्याकडे एम.एच. ३४ बी.एम. ४१५७ या क्रमांकाची एच.एफ. डिलक्स मोटरसायकल होती.

तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने दारू प्यायल्यानंतर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे मोटरसायकल चालवून वृद्धाच्या सायकलला मागून धडक दिली, ज्यामुळे हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. जखमी सायकलस्वारावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Comments