वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे शेतीवादात भावाने भावावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना, एक जण गंभीर

 वरोरा येथे शेतीवादात भावाने भावावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना, एक जण गंभीर

वरोरा / चंद्रपुर, दिनांक २५ मार्च २०२६ – वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे शेतीच्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावावर धारदार लोखंडी शस्त्राने हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सुमीत दिलीप कष्टी (वय २८) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपुर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी सुरज दिलीप कष्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुमीत कष्टी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचे वडील दिलीप कष्टी यांच्याकडे शेती आहे. या शेतीवरून त्याचा लहान भाऊ सुरज याच्याशी सतत वाद होत असतो.

२४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता सुमीत हा घरी जेवण करून पलंगावर झोपला होता. तेव्हा सुरज हा मोबाईलवर गाणी वाजवत घरात आला. यावरुन दोघांमध्ये झोपेच्या वेळी गाणी आवाजात लावल्याबद्दल वाद झाला. वाद वाढताच सुरजने सुमीतला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला. थोड्या वेळाने सुरज हातात धारदार लोखंडी शस्त्र घेऊन परत आला आणि त्याने सुमीत याच्या गळ्यावर, मानेवर तसेच डाव्या हाताच्या बोटाजवळ वार केले. त्यानंतर आरोपी पळून गेला.

गंभीर जखमी झालेला सुमीत रक्तबंबाळ अवस्थेत घराबाहेर आला असता त्याला त्याचे मामा धनराज आसुटकर हे दिसले. त्यांनी त्याला तात्काळ गाडीने चंद्रपुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सध्या तो रुग्णालयात वॉर्ड क्र. १२, बेड क्र. १० येथे उपचार घेत आहे.

वरोरा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) (जिवे मारण्याची धमकी) आणि ३५१(२) (धारदार शस्त्राने गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments