वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

ऑल इंडिया कॅरम क्लबच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

ऑल इंडिया कॅरम क्लबच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

वरोरा, २४ मार्च – ऑल इंडिया कॅरम क्लब, वरोरा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चार दिवसीय कॅरम बोर्ड स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (२३ मार्च) सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वरोरा येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एहतेश्याम अली (माजी नगराध्यक्ष), शेख जैरुदीन छोटूभाई (जिल्हा शांतता समिती सदस्य, माजी सभापती, वरोरा व माजी संचालक, बाजार समिती), अनिल भाऊ झोटिंग (नगरसेवक व माजी उपाध्यक्ष), वसंतराव विधाते (जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष) व यादवराव घ्यार (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

छोटूभाई शेख यांनी याप्रसंगी बोलताना अशा प्रकारची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत वरोरा, जिल्हा चंद्रपूर, विदर्भ व राज्यातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत:

डबल प्रकार

· प्रथम बक्षीस : ₹४१,००१
· द्वितीय बक्षीस : ₹२५,००१
· तृतीय बक्षीस : ₹११,००१

सिंगल प्रकार

· प्रथम बक्षीस : ₹३१,०००
· द्वितीय बक्षीस : ₹१५,००१
· तृतीय बक्षीस : ₹७,००१

उद्घाटन समारंभास खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमुळे विदर्भातील कॅरम खेळाडूंना स्पर्धेचे एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

आयोजक पदाधिकारी : आसिफ शेख, शैलेश समर्थ, रमेश कोरडे, रशीद शेख, करीम शेख, कनया वरुडकर, ओम जाधव, ताराचंद मेश्राम, जीशान कुरेशी, ललित आत्राम, समीर पटेल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.



Comments