वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोराच्या दूषित पाणीप्रश्नी आमदार करण देवतळे यांची सभागृहात लक्षवेधी; दोषी कंपनी ब्लॅकलिस्ट-विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती?

वरोराच्या दूषित पाणीप्रश्नी आमदार करण देवतळे यांची सभागृहात लक्षवेधी; दोषी कंपनी ब्लॅकलिस्ट-

विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती?

मुंबई/वरोरा: विधानसभेत आज वरोरा शहरातील कालबाह्य पाणीपुरवठा योजना व दूषित पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नी भाजप आमदार करण संजय देवतळे यांनी लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी दूषित पाण्यामुळे झालेल्या बालमृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीवर कारवाईची मागणी केली.


आमदार देवतळे यांनी सभागृहात नमूद केले की, वरोरा शहरात १९७२ पासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन मोडकळीस आल्याने वारंवार लिकेज होत असून सांडपाण्याचा पाणीपुरवठा लाईनमध्ये शिरकाव होत आहे. यामुळे नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यासंदर्भात जुलै २०२४ मध्ये दूषित पाण्यामुळे चार वर्षीय पूर्वेश वांढरे (रा. मालवीय वार्ड, वरोरा) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना घडली होती. या प्रकरणात विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल असतानाही अद्याप ठोस प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली.

आमदार देवतळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची मंत्रालय स्तरावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संबंधित कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची ठाम मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना संबंधित मंत्री महोदयांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे नमूद केले. मात्र न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.

"नागरिकांच्या आरोग्याशी व जीविताशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ दिली जाणार नाही," अशी ठाम भूमिका यावेळी मंत्री महोदयांनी व्यक्त केली. आमदार करण देवतळे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे वरोराच्या नागरिकांच्या दीर्घकाळच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments