वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*प्रा. डॉ. संदिप ताजने यांना आचार्य पदवी*

*प्रा. डॉ. संदिप ताजने यांना आचार्य पदवी*

वरोडा : शाम ठेंगडी
        येथील आनंदनिकेतन महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदिप एस. ताजने यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे बेचाळीसाव्या दीक्षांत समारंभात आचार्य पदवी देऊन गौरवण्यात आले.
     प्रा. डॉ. संदिप  ताजने 2016 पासून आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य विभागात तासिका तत्वावर कार्यरत आहेत.  प्रा. डॉ. संदिप ताजने यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत “चंद्रपूर जिल्ह्यातील रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कामगारांचे आर्थिक व सामाजिक दृष्टीकोनातून एक चिकीत्सक अध्ययन” या विषयावर  संशोधन प्रबंध लिहून सादर केला होता.
 त्यांना संशोधनाचे हे कार्य पूर्ण करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील  शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ राधेश्याम बी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यात अनेक सहकारी आणि मित्रपरिवार आणि आई वडिल यांचेही त्यांना सहकार्य मिळाले. त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.


Comments