वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न

भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न

भद्रावती, चेतन लूतडे 
ता. १४ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशनजी रेड्डी साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन स्टील निर्मितीला चालना मिळणार असून, उद्योग, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधण्यात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादय यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी मंत्री डॉ. अशोकजी उईके, राज्यमंत्री अॅड. आशिषजी जयस्वाल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराजभैया अहीर, खासदार प्रतिभाताई धनोरकर, आमदार करणभाऊ देवतळे, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार देवरावजी भोंगळे, जिल्हाधिकारी विनयजी गौडा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे पोलीस अधीक्षक मुम्मुकाजी सुदर्शन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच भद्रावती व परिसरातील आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

...........

Comments