वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

एकोना माईन्स मधून कोळसा चोरी उघडकीस; ५० टन कोळशाचा समावेश



एकोना माईन्स मधून कोळसा चोरी उघडकीस; ५० टन कोळशाचा समावेश


वरोरा (दि. ०९ मार्च) – तालुक्यातील एकोना खाण क्रमांक २ मध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात माजरी क्षेत्राचे मुख्य व्यवस्थापक (खाणकाम) व प्रादेशिक सुरक्षा अधिकारी सूरज करण बैरवा यांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, दिनांक ०४ मार्च २०२६ रोजी रात्री ७.०० वाजता डिस्पॅच इंचार्ज मुकेश कुमार गजबीये यांनी चेक पोस्टचे आवक-जावक रजिस्टर तपासले असता त्यात खाडाखोड आढळून आली. याची माहिती मिळताच बैरवा यांनी जनरल मॅनेजर राकेश प्रसाद यांना कळवून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना मागविल्या. त्यानुसार राजेश करोले यांनी मुख्य संगणक सर्व्हरमधील फुटेजचे परीक्षण केले.

फुटेजच्या पडताळणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.४२ वाजता एमएच-३४-बीजी-६१४७ ही गाडी अवारपूर सिमेंट वर्क्ससाठी कोळसा उचलण्यासाठी आत दाखल झाली. मात्र, नियमानुसार वजनकाट्यावर न जाता थेट कोळसा साठवणूक ठिकाणाहून कोळसा भरून ही गाडी सकाळी १०.५८ वाजता बाहेर पडताना आपला नंबर न वापरता एमएच-३४-एबी-९७२५ या खोट्या क्रमांकाचा पास घेऊन बाहेर पडली. सदर वेळी सुरक्षा रक्षक गोकुळ डंबारे व संदेश बेलेकर हे ड्युटीवर होते.

त्याचप्रमाणे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.१४ वाजता एमएच-३४-बीजी-४३३२ ही गाडी एमएच-३४-बीजी-४६९१ या खोट्या नंबरचा पास वापरून बाहेर पडली. त्यावेळी गोकुळ डंबारे व मनोज माथनकर हे सुरक्षा रक्षक कार्यरत होते.

या दोन्ही प्रकरणांतून सुमारे ५० टन कोळसा (प्रति टन ३,००० रुपये दराने एकूण १,५०,००० रुपयांचा) चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा कोळसा विधी विशेष ट्रेडिंग कंपनीच्या ट्रकद्वारे अवैधरित्या बाहेर नेण्यात आला.

वरोरा पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकांसह संबंधित सुरक्षा रक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


Comments