वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा मतदारसंघासाठी १० कोटींचे क्रीडा संकुल; आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा मतदारसंघासाठी १० कोटींचे क्रीडा संकुल; आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा/विधानभवन, दि. ११ : विधानसभेत आज वरोरा मतदारसंघातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदार करण देवतळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून मतदारसंघात उपलब्ध जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याची मागणी केली.

आमदार देवतळे यांनी माननीय अध्यक्ष महोदयांकडे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या क्रीडा संकुलासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी विनंती केली. या प्रस्तावित क्रीडा संकुलामुळे वरोरा परिसरातील युवक-युवतींना क्रीडा प्रशिक्षणासाठी एक योग्य आणि सुसज्ज असे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“ग्रामीण भागात अनेक हुशार खेळाडू आहेत; मात्र त्यांना योग्य सुविधा आणि मार्गदर्शनाचा अभाव असतो. या क्रीडा संकुलामुळे त्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. येथे विविध क्रीडा प्रकारांसाठी दर्जेदार प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात वरोरा मतदारसंघातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे उत्कृष्ट खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार देवतळे यांनी या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना देऊन युवा पिढीला व्यसनमुक्तीकडे वळविण्यासाठीही या संकुलाचा उपयोग होईल, असे नमूद केले. या मागणीची दखल घेऊन लवकरच ही रक्कम मंजूर करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.




Comments