वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे शेतातील चन्याच्या गंजीला आग, शेतकऱ्याचे १.७५ लाखांचे नुकसान

वरोरा येथे शेतातील चन्याच्या गंजीला आग, शेतकऱ्याचे १.७५ लाखांचे नुकसान

वरोरा, दि. ४ मार्च – तालुक्यातील लोनगाडगा शिवारात एका शेतकऱ्याच्या चन्याच्या गंजीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत सुमारे ३५ क्विंटल चना जळून खाक झाल्याने शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

याबाबत तक्रारदार मिलिंद मनोहरराव भोयर (वय ४७, रा. वंधली, ता. वरोरा) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे लोनगाडगा बसस्टॉपजवळ सर्वे क्र. १०३ मध्ये १९ एकर शेत आहे. त्यापैकी ५ एकरात त्यांनी चना पिकवला होता. ३ एकरातील चना कापून त्याची गंजी (रास) शेतात टाकलेली होती. ही गंजी त्यांनी १ मार्च रोजी तयार केली होती. धुळवडीनंतर थ्रेशरने चना काढण्याचे नियोजित होते.

आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास, ते घरी झोपलेले असताना त्यांच्या गड्याचा मुलगा रविंद्र श्रिरामे याने दारात येऊन शेतातील चन्याची गंजी जळत असल्याचे सांगितले. यानंतर तत्काळ ते रविंद्र, भानुदास श्रिरामे आणि सुर्यभान किनाके यांच्यासह शेतात गेले. परंतु तोपर्यंत चन्याची संपूर्ण गंजी जळून खाक झाली होती. या गंजीत अंदाजे ३५ क्विंटल चना असून त्याची किंमत १ लाख ७५ हजार रुपये असल्याचे भोयर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

घटनास्थळी कोणीही आढळून आले नसून, ही कृत्य कोण्या अज्ञात इसमाने केल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. वरोरा पोलीसांनी तक्रारीची नोंद करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

     अभय मडावी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Comments