वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्या वरोरा तालुक्यात विकास कामांचा धडाका**४ कोटींहून अधिक निधीच्या २० कामांचे होणार भूमिपूजन*

*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्या वरोरा तालुक्यात विकास कामांचा धडाका*

*४ कोटींहून अधिक निधीच्या २० कामांचे होणार भूमिपूजन*

वरोरा : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या लोकप्रिय खासदार प्रतिभा धानोरकर उद्या, मंगळवार १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा तालुक्यात भव्य विकास दौरा करणार आहेत. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावत, खासदार महोदयांच्या हस्ते एकाच दिवशी तालुक्यातील विविध गावांमधील एकूण २० मोठ्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. सकाळी ९.०० वाजता एकाजुर्ना येथून या दौऱ्याचा प्रारंभ होणार असून, सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत हा 'विकास सोहळा' तालुक्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. या दौऱ्यामुळे वरोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाला मोठी गती मिळणार असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.  

या दौऱ्यांतर्गत प्रामुख्याने ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यामध्ये एकाजुर्ना, चिनोरा, कोंढाळा, आष्टी, वडगाव, दिंदोडा, बोरी आणि पांढुर्णी या गावांमध्ये नवीन अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे भूमिपूजन केले जाणार आहे. तसेच केम आणि उमरी नाईक येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होऊन त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील.
रस्ते विकासाच्या दृष्टीने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. यात जामणी-फत्तापूर रोड खडीकरण (५० लक्ष), सोनेगाव-गुंजाळा रस्ता मजबुतीकरण (४० लक्ष), आणि मोखाळा ते आल्फर केम जोड रस्ता (७५ लक्ष) यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. तसेच चिनोरा (पारधी टोला) येथे सिमेंट रस्ते, नाली व पुलाच्या कामांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. वडकेश्वर तीर्थक्षेत्र येथे ३० लक्ष रुपये खर्चाच्या संरक्षण भिंतीचे कामही यावेळी सुरू केले जाईल.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना, पारधी विकास कार्यक्रम आणि तीर्थक्षेत्र विकास निधीतून या कामांसाठी पाठपुरावा करून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला आहे. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा दौरा मैलाचा दगड ठरणार असून, या सर्व भूमिपूजन सोहळ्यांना वरोरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, गावकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Comments