वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत भावपूर्ण कार्यक्रम संपन्नआमची शाळा कधी चांगली करणार चिमुकल्यांचा सवाल ?

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत भावपूर्ण कार्यक्रम संपन्न

आमची शाळा कधी चांगली करणार चिमुकल्यांचा सवाल ?

वरोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, वरोरा येथे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तीभावाने व प्रेरणादायी रूपात साजरी करण्यात आली.

सर्वांनी एकत्रितपणे या मंगल प्रसंगी माता रमाबाई यांच्या पावन स्मृतिप्रती विनम्र अभिवादन समर्पित केले. कार्यक्रमात माता रमाबाईंचे जीवन हे त्याग, सहनशीलता व अबाधित समर्पण यांचा प्रेरक इतिहास असल्याचे उल्लेख करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याच्या वाटेवर सतत साथ देणाऱ्या, स्वतःच्या कष्टांवर मात करून समाजाला प्रकाशमार्ग दाखवणाऱ्या माता रमाबाईंच्या अमूल्य योगदानावर भाष्य करण्यात आले. त्या देत असलेली संघर्षाची प्रेरणा आजही तितकीच प्रासंगिक आहे, असे सांगण्यात आले. नगरपालिकेचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमात वरोरा नगर परिषदेचे सिद्धार्थजी मेश्राम, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने माता रमाबाई यांच्या आदर्श जीवनाचे स्मरण व समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य झाले.
                       उपस्थित विद्यार्थी.

या शाळेकडे लक्ष देण्याची गरज
नगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने नगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी शाळेची स्थिती जाणून घेतली असेल. नगरपालिके मार्फत चालवण्यात येणारी ही शाळा अत्यंत बिकट इमारतीमध्ये उभी आहे आणि या ठिकाणची विद्यार्थी संख्या लक्षात घेता या शाळेची स्थिती लक्षात येते. विद्यार्थ्यांना  एक बिस्कीट पुडा मिळाल्याने मुलेही खूप खुश झाली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना काहीतरी मिळाले याचा आनंद आहे. इमारतीला रंगो रंगोटी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा व्यवस्थित लिहायला वेळ मिळत नसेल तर शोकांतिका आहे. हे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नगरपालिका फक्त फोटो पुरते काम करते काय असा सवाल उभा राहिला आहे. 

बऱ्याच दिवसापासून शाळेमध्ये पिण्याचे शुद्ध पाण्याची सोय, अद्यावत डिजिटल फळा, शाळेमध्ये फॅन, बसण्यासाठी खुर्ची, अभ्यास करण्यासाठी पेपर व पुस्तके, संगणक, शाळेची रंगरगोटी, स्वच्छतागृह, पोषण आहाराची व्यवस्था अशा अनेक बाबीची कमतरता असल्याने नगरसेवकांनी लक्ष द्यावे ही मागणी तेथील पालकाकडून करण्यात आली आहे.
....................
*नगरसेवक राज खंडारे* 
या शाळेचे पुनरुत्थान करण्यासाठी हा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला आहे.  येत्या पाच वर्षात ही शाळा इतर शाळेसाठी मॉडेल बनेल अशी बनवून दाखवू.
..........
माजी नगरसेवक पंकज नाशिककर
इ लायब्ररीवर खर्च करण्यापेक्षा प्राथमिक शिक्षण यावर खर्च झाला पाहिजे. अंगणवाड्या ,प्राथमिक शाळा, सुरू करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु प्रशासनाची उदासीनता दिसून आली.
.............

Comments