गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

वरोरा पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांची तडकाफडकी बदली; कारण अद्याप अस्पष्ट

वरोरा पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांची तडकाफडकी बदली; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी, वरोरा
दिनांक: २७ फेब्रुवारी

वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २७) त्यांना वरोराहून चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तांबडे यांच्या जागी वर्धा येथील पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी वरोरा येथे रुजू होऊन पदभार स्वीकारला आहे.

इतक्या तातडीने बदली करण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी प्रशासकीय स्तरावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तांबडे यांच्या कार्यकाळात वरोरा पोलीस ठाण्याच्या कामकाजावरून कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, अशा प्रकारच्या आकस्मिक बदलीमुळे पोलीस वर्तुळात आणि स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. हि बदली प्रशासकीय कार्याचा एक भाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नवीन पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी आजपासून आपल्या कार्याची सुरुवात केली असून, या बदलीमागील कारणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



Comments