वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

हेडिंग: मासिक १० टक्के व्याजाचे आमिष, ५२ जणांना १.५९ कोटींचा फसवणूक; गुजरातमधील आरोपीवर वरोरात गुन्हा

मासिक १० टक्के व्याजाचे आमिष, ५२ जणांना १.५९ कोटींचा फसवणूक; गुजरातमधील आरोपीवर वरोरात गुन्हा

वरोरा (चंद्रपूर) : दरमहा तब्बल १० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ नागरिकांकडून १ कोटी ५९ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरातमधील वलसाड येथील राजूभाई दयाभाई देसाई (वय ६०) याच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देसाई हा २०२४ मध्ये वरोऱ्यात आला होता. त्याने 'एन.आर. एंटरप्राइजेस' नावाची कंपनी असल्याचे सांगत गुंतवणूकदारांना आकर्षित केले. १९ ऑगस्ट २०२४ पासून अनेकांनी टप्प्याटप्प्याने त्याच्याकडे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे सुमारे अकरा महिने व्याजाची रक्कम वेळेवर मिळत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि अधिकाधिक नागरिकांनी पैसे गुंतविले. मात्र, जुलै २०२५ नंतर मात्र व्याज देणे अचानक बंद झाले.

गुंतवणूकदारांनी जेव्हा वारंवार संपर्क साधला तेव्हा देसाईने बँक खात्यात तांत्रिक अडचण असून दोन-तीन महिन्यांत सर्व रक्कम मिळेल, अशी उत्तरे देण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात मात्र कोणतीही रक्कम गुंतवणूकदारांना परत मिळाली नाही.

फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर काही गुंतवणूकदार थेट गुजरातमधील वलसाड येथे पोहोचले आणि देसाईला घेऊन वरोरा येथे परतले. वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात सर्व गुंतवणूकदार जमले असताना देसाईने काहींना धनादेश दिले; मात्र ते वटले नाहीत. नंतर त्याने स्टॅम्प पेपरवर ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम परत करण्याचे किंवा स्वतःची जमीन विकून पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले. ठरलेल्या मुदतीतही रक्कम न मिळाल्याने अखेर १४ फेब्रुवारीला शरद वाल्मीक मांदाळे (रा. वरोरा) यांनी ५२ गुंतवणूकदारांच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, गुंतवणूकदारांनी देसाईला वरोऱ्यात आणले तेव्हाच त्याच्या पत्नीने गुजरातमधील वलसाड पोलिस ठाण्यात पतीच्या अपहरणाची तक्रार दिल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
......................

Comments