वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ताडोबा बफर क्षेत्रात वाघांच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू; शिवनी वनपरिक्षेत्रातील घटना

ताडोबा बफर क्षेत्रात वाघांच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू;

 शिवनी वनपरिक्षेत्रातील घटना

सिंदेवाही -

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांच्या आपापसातील लढाईत एका अवयस्क बछड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी समोर आली आहे. शिवनी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८४२ मध्ये या बछड्याचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवनी वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवनी येथे गस्त घालत असताना वनविभागाला एका बछड्याचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदम, सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. डुबे आणि एनटीसीएचे प्रतिनिधी बंडू धोत्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, दोन वाघांमध्ये झालेल्या प्रादेशिक झुंजीत (Infanticide/Territorial Fight) या बछड्याचा बळी गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळाच्या पाहणीत बछड्याच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच मृत शरीराचा मागील भाग अन्य वाघाने खाल्ल्याचे दिसून आले. शरीराची मोठी विटंबना झाल्यामुळे तो बछडा नर होता की मादी, याची खात्री घटनास्थळी होऊ शकली नाही.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विलास गावखरे, डॉ. बजरंग सवारे आणि डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी मृत बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि मानक प्रक्रियेनुसार (SOP) मृतदेहावर दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे ताडोबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

Comments