वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

सर्वपक्षीय शोकसभा: वरोर्यात अजितदादा पवार यांच्या स्मरणात श्रद्धांजली कार्यक्रम

सर्वपक्षीय शोकसभा: वरोर्यात अजितदादा पवार यांच्या स्मरणात श्रद्धांजली कार्यक्रम

वरोरा चेतन लूतडे १/२/२०२६

वरोरा: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ वरोरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोकमय आणि शांत वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात राजकीय पक्षाच्या भेदावाचून सर्व पदाधिकारी आणि नागरिक एकत्रित झाले.
कार्यक्रमात खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विलास नेरकर यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली समारंभ पार पडला. राज्याच्या विकासासाठी आणि कृषकहितासाठी केलेल्या अमूल्य योगदानासाठी सर्वांनी माजी उपमुख्यमंत्र्यांना मनापासून आदरांजली वाहिल्या.

कार्यक्रमाच्या दरम्यान, अजितदादा पवार यांनी सर्व राजकीय पक्षांमध्ये जोपासलेल्या सौहार्दाचा आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर केलेल्या निर्णायक लढ्याचा उल्लेख करून सर्व नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात उपस्थित सर्वजण एकमताने म्हणाले की, त्यांच्या मार्गदर्शनाची आणि राजकीय वारसाची कमी नेहमीच जाणवत राहील.

या शोकपूर्ण प्रसंगी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहण्याच्या सर्वपक्षीय संस्कृतीचे हे प्रदर्शन नागरिकांनीही सहानुभूतीने पाहिले. शेवटी, अजितदादा पवार यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी मौन पाळण्यात आले.

Comments