वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

शहरात क्रिकेट सट्ट्याला उधाण; तब्बल एक कोटींपर्यंतचा डाव लावता येतो.शंभर रुपयाला 37/38-ind favourite हा भाव बुकिंनी ठरवला आहे.


शहरात क्रिकेट सट्ट्याला उधाण; तब्बल एक कोटींपर्यंतचा डाव लावता येतो.

शंभर रुपयाला 37/38-ind favourite हा भाव बुकिंनी ठरवला आहे.


(प्रतिनिधी) - वरोरा शहरामध्ये आज भारत-पाकिस्तान टी-ट्वेंटी सामन्याने क्रिकेटचा रंग चढला असतानाच, बेकायदेशीर सट्टेबाजीनेही उच्चांक गाठला आहे. शहरातील बुकिंग ॲप द्वारा सामन्यावर मोठ्या प्रमाणात जुगार लागल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे सट्टेबाजांनी आपली रणनीती बदलली असून आता हा संपूर्ण व्यवहार डिजिटल पद्धतीने, प्रायव्हेट ॲप्लिकेशन्स आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून चालवला जात आहे.
आज सात वाजता होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान मॅचवर शंभर रुपयांच्या मागे 37 /38 भारत, खेळ सुरू होण्याच्या अगोदर वरोऱ्यातील भाव बुकिंनी दिला आहे. यानंतर प्रत्येक बॉल नंतर हा भाव बदलत असतो. त्यासाठी तुम्हाला या बुकिं कडे पैसे जमा ठेवावे लागतात. प्रत्येक बुकी कडे दहा ते पंधरा युवक काम करीत असतात. व त्यांच्या खाली चौकामध्ये पैसे कलेक्शन साठी एक माणूस नेमलेला असतो. हा अवैध व्यवसाय केल्या कित्येक वर्षापासून वरोरा तालुक्यात काही ठराविक लोकांच्या माध्यमातून असाच सुरू आहे. 
कशी चालते ही बेकायदेशीर कॉलरा?
सट्टेबाजांनी आपले मोबाईल क्रमांक बदलून दुसऱ्यांच्या नावावर सिमकार्ड घेतले आहेत. तसेच मागील वर्षी उघडकीस आलेल्या वेबसाइट्स ऐवजी आता www.nice7777.fun, www.purplebook9.com, आणि www.777.com सारख्या नव्या वेबसाइट्सद्वारे हा धंदा सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून खेळाडूंना युजरनेम आणि पासवर्ड देण्यात येतो.
आज बरेच मोबाईल नंबर सात वाजता नंतर बुकीच्या संपर्कात ऑनलाइन राहतील. त्यामुळे विभागाला दक्षता घेऊन यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

या साइट्सवर प्रत्येक देशासाठीचे विजयाचे आकडे (ऑड्स) स्पष्टपणे दिलेले असतात. एका हातापायी दहा हजार रुपयांपासून ते थेट एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम लावण्याची मुभा आहे. केवळ सामन्याच्या निकालावरच नव्हे, तर प्रत्येक चेंडूवर (बॉल बाय बॉल), प्रत्येक षटकानंतर (ओव्हर) आणि प्रत्येक सत्रासाठी (सेेशन) स्वतंत्र सट्टेबाजी सुरू असते. यामुळे लाखो रुपयांचा जुगार खुलेआम खेळला जात असल्याचे वृत्त आहे.

तरुण पिढी भरडली जात आहे.
क्रिकेट विश्वचषकाचा सध्या तरुणांमध्ये असलेला उत्साह आणि पैशाचे आमिष दाखवून सट्टेबाज युवकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. विद्यार्थी, युवक आणि युवती मोठ्या संख्येने या खेळात गुंतल्याचे समोर आले आहे. पैशांचा व्यवहार डिजिटल असला तरी, त्यासाठी 'पैसे' हा शब्द न वापरता 'खाई लगाई' अशा संकेतशब्दांचा वापर केला जातो. सट्टेबाज लॅपटॉपवर प्रत्येक व्यवहाराची रेकॉर्डिंग ठेवतात आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी पैशांची देणी-घेणी केली जाते.

प्रशासनाची निस्तेज भूमिका?
मागील वर्षी वरोरा पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवायांमुळे सट्टेबाजांवर काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र, यंदा कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सट्टेबाजांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात सट्टेबाजीचे हे अवैद्य साम्राज्य सुरळीत सुरू असताना प्रशासनाची भूमिका नेमकी काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे येणारी नवीन पिढी बरबाद होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

...................




Comments