वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शिवबाण घेऊन गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, 17 जण जखमी

त्रिशूल घेऊन गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, 17 जण जखमी

वरोरा (ता. वरोरा) : एका मालवाहतूक वाहनाने भटाळा येथे शिवबाण (त्रिशूल) घेऊन दर्शन करून परतणाऱ्या भाविकांचा एक गट राळेगाव येथे जात असताना त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले तर 5 किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना रविवारी दिनांक 15 ला सकाळच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटाळा परिसरातील नागरिकांचा एक समूह महाशिवरात्रीनिमित्त भटाळा येथील प्राचीन महादेव मंदिरात शिवबाण घेऊन दर्शनासाठी गेला होता. दर्शन संपवून परतताना हे सर्वजण पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात होते. यावेळी एम.एच. ३४ बी.झेड. ९४७८ क्रमांकाचे अशोक लेलँड कंपनीचे मालवाहक वाहन चालक रामा पांडुरंग जाधव यांच्या ताब्यात होते. राळेगाव परिसरात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन पलटी झाले.
अपघात इतका जबर होता की वाहनातील प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या अपघातात भुषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले व सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने १२ जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मयूर वनशिंगे (वय १६), राजू किसन शिवरकर (वय ४२), राजू जाधव (वय ४०), मंथन डाहूले (वय १३), लकी भडके (वय २०), नानाजी मरस्कोल्हे (वय ७०), गणेश खापणे (वय ४०), मारोती र (वय ४५), विनोद गौरकर (वय ५०), रोशन माडवे (वय १७), मारोती (वय ५०) आणि सोहम भोयर (वय १६) यांचा समावेश आहे. यापैकी काहींची नावे पूर्ण न मिळाल्याने त्यांचा तपशील प्रलंबित आहे.

उल्लेखनीय म्हणजे, वरोरा तालुक्यातील भटाळा गावातील हे महादेवाचे मंदिर प्राचीन असून महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. मृत भुषण दोडके याच्यासह इतरही काही भाविक महादेवासाठी शिवबाण (त्रिशूल) घेऊन मंदिरात गेले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments