वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*पाचगाव (ठा.) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न*

*पाचगाव (ठा.) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न* 

वरोरा 
७/१/२०२६
वरोरा तालुक्यातील पाचगाव ठाकरे येथे गुरुदेव सेवा मंडळ, पाचगाव ठाकरे यांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा तीन दिवशीय पुण्यस्मरण सोहळा अत्यंत भक्तीमय व समाजप्रबोधनात्मक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन भजन, कीर्तन, समाजप्रबोधनपर उपक्रम व विविध स्पर्धांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता उद्घाटनाने करण्यात आली. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. रात्री ह.भ.प. आशिष महाराज माणूसमारे यांचे प्रभावी कीर्तन पार पडले. त्यांच्या कीर्तनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रसंतांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली. यावेळी बौद्ध धर्माचे प्रतिनिधी खंती आर्याजी जांभूळघाट, जैन धर्म प्रतिनिधी श्री. महावीर मोदी, ख्रिश्चन धर्म प्रतिनिधी रेव्ह. फादर विजय साळवे, शीख धर्म प्रतिनिधी अमर सिंग जाधव, मुस्लिम धर्म प्रतिनिधी झाकीर अहमद कुरेशी तसेच ह.भ.प. केशव महाराज खिरटकर यांच्या उपस्थितीत मौनश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वधर्मीय ऐक्य व सामाजिक सलोख्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
याच सोहळ्यात ह.भ.प. सुनील महाराज लांजुळकर तसेच कुमारी कृष्णाई सुनील लांजुळकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमही भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला. तीन दिवस चाललेल्या या पुण्यस्मरण सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारा हा सोहळा समाजात सद्भावना, एकता व नैतिक मूल्यांचे बीज पेरणारा ठरला.

श्री शंभूनाथजी वरघने यांची वरोरा नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

Comments