वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्घाटन*

*पालकमंत्र्यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्घाटन*

चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर वनविभागाअंतर्गत चंद्रपूर परिक्षेत्रात येत असलेल्या लोहारा येथे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामनुजम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वन अधिकारी राजन तलमले, लोहाराच्या सरपंच किरण सिध्दार्थ आदी उपस्थित होते.
लोहरा जंगल सफारी पर्यटन गेटद्वारे वन-वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित करणे, वनांचे  शाश्वत जतन करून लोकांचे वनावरील अवलंबन कमी करणे व वनांच्या माध्यमातून ग्रामीणांना रोजगार उपलब्ध देणे, जुनेरस्ते व कुपरस्ते यांचा वापर करून 35 कि.मी. चा परिसर पर्यटनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. सदर क्षेत्रात एकूण 15 कृत्रिम पाणवठे व  नैसर्गिक लोहारा तलावाचा समावेश आहे.

या क्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण, चितळ, सांबर, निलगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगुस, मसण्याउद, सायाळ, रानडुक्कर हे प्राणी तसेच विविध प्रकारची झाडे, पक्षी व विविधरंगी फुलपाखरे यांचा समावेश आहे.

००००००

Comments

Post a Comment