वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

गुरुदेव सेवा मंडळ आसाळा व महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

गुरुदेव सेवा मंडळ आसाळा व महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न.

माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांची  उपस्थिती.

वरोरा, दि. ३१/१/ २०२६: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी  सोहळ्याच्या अखंड परंपरेप्रमाणे, यावर्षीही गुरुदेव सेवा मंडळ, आसाळा व छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, सुर्ला (बोर्डा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० जानेवारी रोजी आसाळा येथे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात विविध आरोग्य सेवा  गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण ८६ रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती .तर ५२ जणांना आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली. ४२ व्यक्तींची सिकलसेल तपासणी, २२ रक्तनमुन्यांची तपासणी तसेच ६७ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. नेत्रतपासणीदरम्यान १७ रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळल्याने त्यांना १३ फेब्रुवारी रोजी समता फाउंडेशन, मुंबई यांच्यामार्फत शस्त्रक्रियेसाठी नियोजित करण्यात आले आहे. नवीन ५ उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ३ कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण व ९ क्षयरोगाचे संशयित रुग्ण ओळखण्यात आले.

अमन ब्लड बँक, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात २४ रक्तदात्यांनी उदारहस्ते आपले रक्तदान केले.

या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र कोसळसार व उपप्राथमिक आरोग्य केंद्र भटाळा येथील अधिकारी, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन व सहभाग लाभला. कार्यक्रमाला माननीय बच्चुभाऊ कडू यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातील महत्त्वाची चर्चा डुकरे यांच्या सोबत करण्यात आली. यावेळी गावातील सेवाभावी उपक्रम त्यांनी आपला सहभाग दर्शविला.

गुरुदेव सेवा मंडळ, आसाळा, छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, सुर्ला येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी, गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच सर्व गावकऱ्यांनी या समाजहिताच्या कार्यासाठी उत्तम सहकार्य केले.


Comments