वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*स्वयंरोजगारासाठी फायदेशीर मशरूम उत्पादन तंत्रज्ञान*

*स्वयंरोजगारासाठी फायदेशीर मशरूम उत्पादन तंत्रज्ञान* 

महारोगी सेवा समिती संचालित वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य फलोद्यान आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोद्यान मंडळ - एकात्मिक फलोद्यान  विकास अभियानांतर्गत *मशरूम उत्पादन तंत्रज्ञान*  या विषयावर निवासी व निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक  ०६ ते ०८  जानेवारी २०२६ या दरम्यान करण्यात आले.

प्रशिक्षणाचे उदघाटन  डॉ. सुहास पोतदार, प्राचार्य आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, श्री रवि राठोड, तालुका कृषी अधिकारी, वरोरा, सौ. मिली पुसदेकर, प्रशिक्षण संयोजिका यांच्या उपस्थितीत झाले. या प्रशिक्षणात चंद्रपूर, वर्धा, नागपूर व भंडारा  या चार  जिल्ह्यातील एकूण ३४ प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग नोंदवला.  मशरूम उत्पादन परिचय, महत्त्व, मशरूमचे गुणधर्म, उत्पादन  तंत्रज्ञान, मशरूम  उत्पादनासाठी आवश्यक बाबी, माध्यम निवड, माध्यम निर्जंतुकीकरण, पिशवी भरणे, त्याचे व्यवस्थापन, रोग नियंत्रण, काढणी, मशरूमचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, विक्री व्यवस्थापन व  मशरूम उत्पादनाशी निगडीत विविध शासकीय योजना  या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच या प्रशिक्षणात  प्रकल्प भेटीचे  आयोजन श्री प्रफुल्ल शेंडे, मु. पो. खुटाळा तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर यांच्या GBS मशरूम  अँड ऍग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड येथे करण्यात आले. या प्रशिक्षणात डॉ मनोज जोगी, डॉ  प्रशांत वाघ, डॉ प्रशांत राखोंडे, डॉ रविशंकर पारधी, श्री पवन पांडे, सौ विजयालक्ष्मी मानकर, श्री. अडकिने यांनी मार्गदर्शन केले. 
 प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी डॉ अनिल भोगावे, श्री अनिल चौधरी, सौ मीना अंबाडे यांनी सहकार्य केले.

Comments