वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कल्याणेश्वर हनुमान मंदिर येथे गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 

कल्याणेश्वर हनुमान मंदिर येथे गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

वरोरा : पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल, चंद्रपूर (टाटा मेमोरियल ट्रस्ट, मुंबई) यांच्या सौजन्याने तसेच स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत कॅन्सर रोग निदान व मार्गदर्शन शिबिर आणि श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा कल्याणेश्वर हनुमान मंदिर, कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे आयोजन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. वरोरा शहर व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणीची ही मोठी संधी उपलब्ध झाली असून, कॅन्सरचे प्राथमिक निदान, तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन या शिबिराद्वारे करण्यात येणार आहे. तसेच पुढील उपचाराविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल.

कार्यक्रमाचे ठिकाण कल्याणेश्वर हनुमान मंदिर, कॉलरी वॉर्ड, वरोरा असून, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिबिर पार पडणार आहे.

तसेच श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ७ वाजता नवीन नगरसेवकांचा सत्कार समारंभ देखील होणार आहे.

या सर्व कार्यक्रमाचे भव्य आयोजन नगरसेविका  मनीषा संजय दानव यांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव  आशिष मारोती घुमे, उपाध्यक्ष संजय दानव तसेच कल्यानेश्वर गणेश मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहे.

Comments