वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे सांसद प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

वरोरा येथे सांसद प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा : '२४ तास सेवा ग्रुप' तर्फे वरोरा येथे एक नवीन रुग्णवाहिका (एम्ब्युलन्स) सेवेमध्ये रुजू करण्यात आली. या वाहनेचे औपचारिक लोकार्पण चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. हा कार्यक्रम  यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात '२४ तास सेवा ग्रुप'चे अध्यक्ष लखन केशवानी, कार्यकर्ते अनिकेत मेश्राम, अक्षय शिरसागर, महेक केशवानी, किरण लेंडे, मनीषा मेश्राम, तसलीम शेख, सुनंदा पाऊलकर या पदाधिकाऱ्यांसह प्रविण काकडे, पूर्व नगराध्यक्ष विलास टिपले, वरोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण खिरटकर इत्यादी गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.


ग्रुपची सेवा व वैशिष्ट्ये :
'२४ तास सेवा ग्रुप' ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वरोरा शहरात रुग्णांसाठी अखंड सेवा पुरवत आहे. नवीन रुग्णवाहिका आधुनिक सुविधांसह सुसज्ज असून, ती शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने व तब्येतीसाठी वाहतूक सुविधा पुरवेल. या वाहनाच्या समर्पणामुळे ग्रुपच्या सेवा क्षमतातील विस्तार होणार असून, समाजसेवेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

कार्यक्रमाच्या अखेरीस, सर्वांनी ग्रुपच्या या समाजहितैषी पाऊलाचे स्वागत केले व सेवेची दीर्घकाळ चालू राहो, अशी शुभेच्छा व्यक्त केल्या.

        गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप कार्यक्रम
.....

Comments