वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*कोळसा खाण कंपनीच्या मजुरांचे थकीत वेतन व स्थानिक रोजगाराचे प्रश्न चर्चेत; प्रशासनाने हस्तक्षेप केला*

*कोळसा खाण कंपनीच्या मजुरांचे थकीत वेतन व स्थानिक रोजगाराचे प्रश्न चर्चेत; प्रशासनाने हस्तक्षेप केला* 

वरोरा ७ जानेवारी २०२६ - उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या दालनात आज कर्नाटक एमटा कोळसा खाण कंपनीत काम करणाऱ्या सुमारे ६० मजुरांचे थकीत वेतन व स्थानिक नोकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज परिसरात बरीच वर्षे सुरू असलेल्या या खाणकामासंबंधी पुनर्वसन व बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत.

कोळसा उत्खननाचे काम दीर्घकाळ चालू असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाला सभेसाठी बोलावून कामगारांचे वेतन व नोकरीसंबंधित चर्चा यशस्वीपणे पार पाडली. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते तसेच कंपनीत काम करणारे ट्रक ड्रायव्हर व ऑपरेटर्स उपस्थित होते.

बरांज गाव परिसरातील अनेक मागण्या प्रलंबित असून, कंपनीविरुद्ध गावकऱ्यांनी आपल्या समस्या प्रशासनामार्फत सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. तथापि, अद्याप त्यांना काही निराकरण मिळाले नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात बेरोजगार तरुणांनी आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडले. या चर्चेमुळे प्रशासनाने खाण कंपनीकडे दबाव आणला असून, लवकरच काही सोडवणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Comments