वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मारोडा येथे 474 घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप**मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रम*

*मारोडा येथे 474 घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप*

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रम*

चंद्रपूर, दि. 10 : राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती, मूल यांच्या वतीने 9 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत मारोडा येथे 474 घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मारोडा येथील विश्वशांती विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित या कार्यक्रमास amdar सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेती वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोडाचे सरपंच भिकारुजी शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून संध्या गुरनूले, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक मंजिरी टकले, घुगुस येथील लॉईड मेटल्सचे जनरल मॅनेजर विद्या पाल, गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मारोडा हे गाव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव कन्नमवार यांची कर्मभूमी असल्याचे नमूद करून, या गावातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप होत असल्याचा विशेष आनंद व्यक्त केला. शासनाच्या धोरणानुसार रेती मोफत असून वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यांनी करावयाचा असतो; मात्र लॉयड मेटलच्या सीएसआर निधीतून मारोडा हे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून, येथे लाभार्थ्यांना रेती घरपोच मिळणार आहे. तसेच प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात वाहतुकीसाठी पाच हजार रुपये जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी, मारोडाचे सरपंच श्री. शेंडे यांनी मोफत रेतीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी 25 लक्ष रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आला, ज्यामुळे 474 लाभार्थ्यांना शासन अनुदानासोबत अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

या अभियानांतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, आधार, जॉबकार्ड व बँक खाते केवायसी शिबीर, महसूल विभागामार्फत विविध प्रमाणपत्रांचे वाटप तसेच उमेद अंतर्गत लखपती दीदींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी किशोर शिंदे  यांनी केले. संचालन विद्या कोसे यांनी तर आभार उपसरपंच अनुप नेरलवार यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती मूल, ग्रामपंचायत मारोडा तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
........

Comments