वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये राहुल जानवे बाजी मारणार ?एकूण ३४३९ मतदार, ६ उमेदवारांची होणार चाचपणी

वरोरा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये राहुल जानवे बाजी मारणार ?

एकूण ३४३९ मतदार, ६ उमेदवारांची होणार चाचपणी

वरोरा: वरोरा नगरपालिकेच्या प्रभाग सात वार्डातील निवडणुकीत सहा उमेदवारांची स्पर्धा आहे. या वार्डात एकूण ३४३९ मतदार आहेत, त्यापैकी १७१५ पुरुष तर १७९५ महिला आहेत. या वार्डात यात्रा वार्ड, कॉलरी वार्ड, राजीव गांधी वार्ड व कॉलरी येथील मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.

निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष व स्वतंत्र उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. उमेदवार व त्यांची चिन्हे पुढीलप्रमाणे:


१. राहुल पुंडलिक जानवे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) - 'मशाल' चिन्हावर (बटन क्र. ६)
२. सचिन नागोराव चूटे (भारतीय जनता पक्ष) - 'कमळ' चिन्हावर
३. राजकुमार लक्ष्मण खंडारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) - 'हात' (पंजा) चिन्हावर
४. गणेश उर्फ प्रज्वल नंदकिशोर जानवे (शिवसेना - एकनाथ शिंदे गट) - 'धनुष्यबाण' चिन्हावर
५. राष्ट्रपाल गायकवाड (वंचित) - 'सिलेंडर' चिन्हावर
६. सुरज पारशिवे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - अजित पवार गट) - 'घडी' चिन्हावर

यापैकी शिवसेना (उद्धव गट)चे उमेदवार राहुल पुंडलिक जानवे यांनी आधी वरोरा नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून (२०१२-२०१४) तसेच दोन वेळा नगरपालिका सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अनेक रुग्ण व अपघातग्रस्तांना मोफत सेवा पुरविली आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी तसेच नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्याचा त्यांचा आढावा आहे. यावर्षी त्यांनी मतदारांना आशीर्वादरूपी भरघोस मतदानाचे आव्हान दिले आहे.

यात्रा वार्डातील बरेच उमेदवार बाहेरील असून जनसंपर्क कमी असल्याचा दावा राहुल जानवे यांनी केला आहे. त्यामुळे मतदारांसोबत राहुल जानवे यांची नाळ जोडल्याचे तेथील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. सर्वसामान्यांचे दैनंदिन कार्य असो व आर्थिक मदत नेहमी समाज कार्यासाठी  तत्परतेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

निवडणुकीत प्रत्येक उमेदवार व पक्ष आपापल्या चळवळीतून मतदारांना संपर्क साधीत आहेत. यामध्ये राहुल जानवे  बाजी मारनार काय हे येणाऱ्या दिवसात कळणार आहे. 

प्रभाग सात मधील  २० डिसेंबरला  मतदान होणार आहे. यामध्ये सर्वच पक्ष आपापली दावेदारी घोषित करित आहे. भाजप पक्षाचे सचिन चूटे यांनी सुद्धा आपली दावेदारी घोषित केली आहे. 
---------------------------------------------



Comments

  1. अनिल मधुकरराव झोटिंग

    ReplyDelete

Post a Comment