वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भव्य कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन

भव्य कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन

पाटाळा : जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा यांच्या वतीने पुरुषांसाठी भव्य कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे अध्यक्षपद माननीय हंसराजभैय्या अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, भारत सरकार) यांनी भूषवले.

स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आमदार मा. करणजी देवतळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या समारंभाला विधानसभा प्रमुख मा. रमेशजी राजूरकर, विधानसभा संघटक मा. किशोरजी बावणे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. दिवाकरराव पावडे, मा. उमेशजी बोडेकर, सौ. अमृताताई सुर, मा. रवींद्रजी धोटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले. आयोजक मंडळीच्या या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments