वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*नागपूर येथे झालेल्या 1st ओपन स्टेट योगा स्पर्धा 2025 वरोरा येथील एस.ए.योगा इन्स्टिट्यूट च्या योगपटूनी मारली बाजी.*

**नागपूर येथे झालेल्या 1st ओपन स्टेट योगा स्पर्धा 2025 वरोरा येथील एस.ए.योगा इन्स्टिट्यूट च्या योगपटूनी मारली बाजी.* 

क्रिडा भारती नागपूर महानगर, संस्कृती फाउंडेशन व जय गुरुदेव बहुद्देशीय संस्था योगदर्शनम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 1st open स्टेट competition येथे  राज्यातून एकूण विविध वयोगटातील 350 योगस्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत *एस.ए.योगा इन्स्टिट्यूट* च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 15 योगपटूनी विविध वयोगटात आपली सर्वोत्तम कामगिरी करत *8 Gold* *मेडल* ,* *2 bronze व 5 silver* मेडल  प्राप्त केले.
तसेच सर्वांनी बेस्ट परफॉर्मन्स दिल्या मुळे *एस.ए.योगा इन्स्टिट्यूट* ला उत्कृष्ट टीम म्हणून सन्मानित करण्यात आले. 
या सर्व यशाचे श्रेय विजेत्यांनी *एस.ए.योगा इन्स्टिट्यूटचे संस्थापक व प्रशिक्षक* *स्वप्नील पोहनकर* व *अनिकेत ठक* तसेच आपल्या *पालकांना* दिले.

Comments