वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

निवडणुका पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) घेतल्या जातील

निवडणुका पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) घेतल्या जातील

फक्त बातमी 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 42 नगरपंचायती आणि 246 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी सज्जता दर्शवली आहे. यामध्ये 6859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून, मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केल्या जातील.

निवडणुकांमध्ये एकूण 1,07,03,500 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, ज्यासाठी 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुका पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) घेतल्या जातील. उमेदवारांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाईल. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असून, ते नसल्यास अर्ज केल्याची पावती सादर करून सहा महिन्यांत प्रमाणपत्र देण्याची सक्ती आहे.



*राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित-*

*अर्ज दाखल करणे-  10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर*
*अर्जाची छाननी-* *18 नोव्हेंबर*
*अर्जांची माघार-21 नोव्हेंबर*
*उमेदवारांना चिन्ह वाटप- 26 नोव्हेंबर*
*मतदान दिनांक-2 डिसेंबर 2025*
*मतमोजणी दिनांक- 3 डिसेंबर 2025*

*राजपत्र प्रसिद्ध होणार-10 डिसेंबर 2025*
*ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल होणार.*


Comments