वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

काँग्रेस महिला शहर अध्यक्ष दिपाली माटे यांचा काँग्रेसला रामरामभाजप उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा

काँग्रेस महिला शहर अध्यक्ष दिपाली माटे यांचा काँग्रेसला रामराम
भाजप उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पद ओढून आणण्यासाठी जोर लावत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षातील पदाधिकारी आपल्या पक्षात ओढण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे.

शनिवारी सकाळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दिपाली माटे यांनी वैयक्तिक कारणास्तव शुक्रवारी खासदार कार्यालयात राजीनामा दिल्यानंतर माटे यांनी भाजप पक्षाच्या उमेदवार सौ. मायाताई राजूरकर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही घटना काँग्रेस पक्षासाठी दुसरी मोठी हादरा देणारी ठरली आहे. याआधी, काँग्रेस नेते राजू महाजन यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली माटे यांच्या भाजप पाठिंबा नंतर सौ. राजूरकर यांनी माटे यांचे आभार मानले आहेत. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
भाजप नेते रमेश राजुरकर यांच्या कार्यालयात हा पाठिंबा दर्शवण्यात आला असून यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी सौ. माटे यांच्यासोबत त्यांचे पती ज्ञानेश्वर माटे उपस्थित होते.

वरोरा नगरपालिकेत ओबीसी महिला राखीव जागा असल्याने यावेळी महिलाच नगराध्यक्ष बनणार आहेत. मात्र, पडद्यामागे अनेक राजकीय नेतृत्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून, दिपाली माटे यांच्या भाजप-पाठिंब्यामुळे शहरातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो. या निवडणुकीत नगराध्यक्ष पद  कोणाच्या पदरी पडेल, हे पाहण्यासारखे असेल.
जाहिरात

........



Comments