वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

वरोरा - शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या बोजामुळे एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सचिन जगन खेवले (वय २८ वर्षे) यांनी गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक नष्ट झाल्याने निराश होऊन आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

सचिन वरोरा तालुक्यातील जामणी गावाचा रहिवासी होता. कोरोना काळात त्यांचे वडील गेल्याने शेतीची सर्व जबाबदारी सचिनवर आली होती. त्याच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुलं अशी सहा सदस्यांची मंडळी होती. मोठा भाऊ नागपूरला नोकरी करतो तर मोठी बहीण सासरी आहे. अशा परिस्थितीत सचिन आणि त्याची आई घरात एकटेच होते.

सचिनवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टेंमुर्डा शाखेकडून दोन लाख बहात्तर हजार सहाशे रुपये (₹२,७२,६००) कर्ज होते. शेतीचे नुकसान झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची चिंता या तरुण शेतकऱ्याला पडली आणि त्याने हा मार्ग अवलंबला.

आत्महत्येनंतर सचिनची आई एकटी राहिली आहे. "माझा पती गेला, मोठा मुलगा बाहेर आहे, मुलगी सासरी आहे. आता माझ्या एकटीच्या जीवनाचा काय?" अशी हाक हतबल आई देत आहे.

या प्रकरणाने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणि शेती संकटाची गंभीरता पुन्हा एकदा उघडकीला आली आहे.



Comments