वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा नगरपरिषद निवडणुक:

वरोरा नगरपरिषद निवडणुक: 2025
नगाराध्यक्ष पदासाठी व  सदस्यासाठी मतदान २ डिसेंबरला होणार.

शेख अनिस हनीफचे नामनिर्देशन फेटाळल्याने प्रभाग ७-ब मधील मतदान पुढे ढकलण्यात आले; 
२० डिसेंबर रोजी होणार मतदान

वरोरा 
चेतन लूतडे 
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्षाच्या दोन उमेदवारांसाठी वेगवेगळे एबी फॉर्म भरल्यामुळे उद्भवलेल्या गोंधळातून नगरपरिषद निवडणुकीतील गट 7 'ब' प्रभागातील मतदानास विलंब झाला असून, सुधारित कार्यक्रमानुसार आता २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.

प्रभाग क्रमांक ७-ब साठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेख अनिस हनीफ आणि पारशिवे सुरज अशा दोन उमेदवारांना नामनिर्देशनासाठी एबी फॉर्म दिले होते. निवडणूक नियमांनुसार, एकाच पक्षाने एकापेक्षा जास्त उमेदवाराला एबी फॉर्म दिल्यास, कोणता उमेदवार अधिकृत आहे हे नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम तारखेला दुपारी ३ वाजेपूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांना कळवावे लागते. पक्षाने हे केले नसल्याने, प्रथम नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवाराला अधिकृत उमेदवार मानण्यात येते. या नियमांनुसार पारशिवे सुरज यांचे नामनिर्देशन स्वीकारण्यात आले, तर शेख अनिस हनीफ यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आले होते.

या निर्णयावर शेख यांनी जिल्हा न्यायालयात केलेले अपीलही न्यायालयाने फेटाळले. हा निर्णय २५ नोव्हेंबर रोजी झाला. त्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, २२ नोव्हेंबरनंतर अपीलाचा निर्णय आल्यामुळे प्रभाग ७-ब मधील सदस्यपदाची निवडणूक सध्या स्थगित करण्यात आली आहे.

यामुळे सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, सदर प्रभागासाठीचे मतदान आता २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, उमेदवारांना नवीन नामनिर्देशन भरायची संधी नसून, जर कोणाला माघार घ्यायची असेल तर तीच त्यांची एकमेव पर्याय आहे. नवीन अर्ज भरता येणार नाही.

बाकी सर्व मतदान 2 डिसेंबर रोजी वेळापत्रकानुसार पार पाडण्यात येईल असे वरोरा येथील निवडणूक अधिकारी संदीप भस्के यांनी सांगितले.
-----------------------------------------
ज्या ठिकाणी तक्रार आहे त्या ठिकाणीच खालील वेळापत्रक लागू होईल.
आदेशानुसार, सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

४ डिसेंबरः सुधारित निवडणूक वेळापत्रकाची घोषणा
१० डिसेंबरः नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख
११ डिसेंबरः निवडणूक चिन्हांचे आणि अंतिम उमेदवारांचे पुनर्वाटप यादी
२० डिसेंबरः आवश्यक असल्यास मतदान
२१ डिसेंबरः मतमोजणी

आयोगाने स्पष्ट केले आहे की ज्या टप्प्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे तेच टप्प्यांमध्ये पुन्हा मतदान केले जाईल. जिथे प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण झाली आहे, तिथे निवडणूक वेळापत्रक लागू राहील. 

महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत एका नव्या वळणाने राजकीय क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. नामांकनावरील छाननीनंतर दाखल झालेल्या अपीलांवर २३ नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर निर्णय झालेल्या त्या सर्व निवडणूक क्षेत्रांसाठी, निवडणूक टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे.

 -------------------------------------







Comments