वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

अखेर अपघातात मृत्यू अशोक कुमरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून ट्रक पोलिसांच्या ताब्यात आणि ड्रायव्हर लॉकअप मध्ये छोटूभाई व त्यांचे सहकारी यांच्य पाठपुराची दखल

अखेर अपघातात मृत्यू अशोक कुमरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून ट्रक पोलिसांच्या ताब्यात आणि ड्रायव्हर लॉकअप मध्ये

 छोटूभाई व त्यांचे सहकारी यांच्य पाठपुराची दखल

वरोरा 

                  वरोरा येथील दत्त मंदिर  वार्ड येथील रहिवासी अशोक गोपाळराव कुंबरे वय 63 वर्ष धंदा रोज मजुरी चौकीदारी हे इसम दिनांक 12/ 11/ 2025 ला शहीद योगेश डावले चौक वरोरा येथे रोडच्या बाजूला सायकल घेऊन उभे असताना दहा चक्का आयवा ट्रक क्रमांक MH16DK2777 वाहन चालक गणेश मरस कोल्हे वय 25 वर्ष हे रेल्वे स्टेशन कडून भर वेगात ट्रक चालवत आणून रात्री 8 वाजताच्या सुमारास अशोक यांच्या अंगावरून ट्रक नेऊन  त्यांच्या जागेतच मृत्यू झाला आणि ट्रक चालक हा ब्रिज ओलांडून नागपूर रोडवर कडे फरार झाला यावेळी चौकात असलेले नागरिक व पोलीस कर्मचारी यांनी कुमरे यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले असताना ते मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले असता  मृतकाला उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले त्यानंतर अनेक वॉर्डातील नागरिक या ठिकाणी जमा झाले यावेळी माजी सभापती शेख जैरूद्दीन छोटूभाई व यांचे सहकारी यांनी ठाणेदार तांबे साहेब यांना फोनवरून सदर माहिती देऊन कार्यवाहीची मागणी केली. त्यावेळी लगेच साहेबांनी पीएसआय मित्तलवार व पीएसआय तलवार यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवले यावेळी छोटूभाई व त्यांच्या कुटुंबातील व सहकारी यांनी जोपर्यंत ट्रक व ड्रायव्हर यांना पोलीस स्टेशनमध्ये जमा करून कार्यवाही व मृतक कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यंत पीएम व अंत्यविधी करण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन मृतकाचे मुलं निलेश कुमरे व निखिल कुमरे व नातेवाईक विलास पेंदे यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला लावले.त्यानंतर छोटूभाई व त्यांचे सहकारी यांनी दिनांक 12 ला रात्री दहा वाजेपासून ते दिनांक 13 ला चार वाजेपर्यंत ठाम भूमिका घेऊन पोलीस स्टेशनमध्ये थांबून यांच्या पाठपुरावा केल्याने ठाणेदार तांबे यांच्या पुढाकाराने पीएसआय तालेवार पीएसआय मित्तलवार व पीएसआय भस्मे  यांनी अत्यंत परिश्रम घेऊन अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असताना ट्रक वेगात असल्याने त्याचे नंबर व ओळख होऊ शकली नाही त्यानंतर त्यांनी अनेक त्यांचे खबरी व नागरिकांकडून माहिती घेऊन वर्धा येथून ट्रक शोधून ट्रक व ड्रायव्हरला पोलीस ठाण्यात दुपारी दोन वाजताच्या सुमारास पकडून जमा केले व ड्रायव्हरला तुरुंगात टाकले यावेळी छोटूभाई यांचे सहकारी व मृतकाचे नातेवाईक यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सदर मालक श्री ठाकूर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून मदत करावीअशी ठाम भूमिका मांडल्यावर पोलीस अधिकारी यांनी ट्रक मालक यांच्याशी संपर्क केला तो मुंबईला असल्यामुळे त्यांनी त्यांच्या दिवाणजीला पाठविले त्यानंतर मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्याकरिता चर्चा करून मागणी करण्यात आली अखेर एक तासानंतर दिवाणजी यांनी मालकासोबत बोलून 2 लाख आर्थिक मदत आणि 25000 अंत्यविधी करता छोटूभाई व 100 नागरिकांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय येथे मृतकाचे नातेवाईक विलास पेंदे व निखिल कुंबरे यांना दिले.यावेळी छोटूभाई यांचे सहकारी व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यामध्ये पोलीस व सहकाऱ्यांचे चांगल्या कामगिरीमुळे मृतकाच्या कुटुंबाला नगदी रक्कम 2 लाख 25 हजार व ट्रकचे दस्तऐवजपूर्ण राहिल्याने अंदाजे १५ लाख रुपये पर्यंत इन्शुरन्स प्लॅनची मदत मिळण्याकरता वकिलाकडे सदर प्रकरण देणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Comments