वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वरोरा दौरा, स्थानिक निवडणुकांसाठी मोठी जाहीर सभा*

*नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वरोरा दौरा, स्थानिक निवडणुकांसाठी मोठी जाहीर सभा* 

उद्याला दुपारी 4.30वा. सभेचे आयोजन. 

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा  (मंगळवार, दिनांक 25 नोव्हेंबर, 2025) वरोरा येथे दौरा आहे. त्यांची  जाहीर सभा दु.4.30वा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात होणार आहे.
 शिवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी पक्षाच्या सर्व शिवसैनिकांना ,आजी /माझी पदाधिकारी ,कार्यकर्त्या आणि  मतदार बंधूंना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. 

महाराष्ट्राचे लाडके भाऊ वरोरा शहरात येत असल्याने लाडक्या बहिणीमध्ये भेटण्यासाठी उत्साह निर्माण झाला असून  मंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या सभेमुळे वरोरा भागातील राजकीय वातावरण अधिकच गतिमान झाले आहे. स्थानिक निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी ही सभा महत्त्वाची मानली जात आहे.

 *सभेचे तपशील:* 
· वक्ते: महाराष्ट्र नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे
 *· स्थळ: कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा येथील पटांगण
· दिनांक: 25 नोव्हेंबर, 2025 (मंगळवार)
· वेळ: 4.30वा.

                     नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 
........

Comments