वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भाजपवर विश्वास ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग 2 वार्डमधील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.आमदार देवतळे यांच्या हस्ते स्वागत, भाजपची ताकद वाढली.

भाजपवर विश्वास ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग 2 वार्डमधील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.

आमदार देवतळे यांच्या हस्ते स्वागत, भाजपची ताकद वाढली.

वरोरा 
चेतन लूतडे 
वरोरा : वरोरा येथे आमदार करणभाऊ देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक-2 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला. वैभवजी लोहकरे आणि मंगेशजी पिसाळ यांच्या नेतृत्वात या कार्यकर्त्यांनी पक्षावर विश्वास ठेवत हा पक्ष प्रवेश करण्यात आला.

प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांमध्ये रोहित निखाडे, उमेर शेख, राम धोतरे, पवन गायकवाड, अविनाश मंजूलकर, किसन वर्मा, पारस येवले, अस्मित यादव, करण देवकर, प्रेम लोहकरे, अक्षय कामडी, सूरज बावणे, अयान पठाण, अनिकेत पिसाळ आणि प्रथम हरणे यांचा समावेश होता.

या प्रसंगी आमदार करणभाऊ देवतळे यांनी नव्याने पक्षात सामील झालेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी नवीन सदस्यांना पक्षाच्या विचारधारेत सक्रिय राहून समाजसेवेच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या जाहीर प्रवेशामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात हलचल निर्माण झाली असून, भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी बळकट झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या मताधिक्यात निश्चितच वाढ होईल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

प्रभाग दोन मध्ये भाजप पक्षातर्फे मंगेश पिसाळ यांच्या पत्नी व वैभव लोहकरे हे संभाव्य उमेदवार होऊ शकतात. अजून पर्यंत कोणतीही यादी पक्षा तर्फे प्रसारित करण्यात आलेली नाही. 

Comments