वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा

*सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा*

चंद्रपूर, दि. 21 : जिल्हा प्रशासन आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत, चंद्रपूर तर्फे सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी/पदयात्रेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रा. डॉ. गुरुदास बाल्की, एन.एस.एस. जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.

कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद  काटकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. माध्यमशेट्टीवार, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत सुशिल भड, कॅप्टन डॉ. सतिश कन्नाके, प्रा. डॉ. कुलदीप गोंड, एन.एस.एस. समन्वयक,  मोरेश्वर गायकवाड, क्रीडा अधिकारी, समन्वयक मंगेश डुबे उपस्थित होते.

उद्घाटन प्रा. डॉ. बाल्की यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारत एकीकरणातील कार्य स्मरण करून युवकांना राष्ट्रीय एकता, विकास आणि सेवा यांचा संदेश दिला. पदयात्रेच्या प्रारंभी प्राचार्य प्रा. डॉ. काटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय एकता दिवस शपथ, आत्मनिर्भर भारत संकल्प आणि नशामुक्ती प्रतिज्ञा उपस्थित युवक-युवतींना देण्यात आली. कार्यक्रमात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य यांचेही आयोजन करण्यात आले.  या पदयात्रेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या 500 युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुशिल भड यांनी केले. संचालन डॉ. पुरुषोत्तम माहुरे यांनी तर आभार  प्रा. डॉ. कुलदीप गोंड यांनी मानले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सोहेल, यश आसुटकर, मारोती बोबाटे, खोमेश भड व मंगेश भट यांनी मेहनत घेतली.

Comments