लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा*

*वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा*

जनता शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., चंद्रपुर चे अध्यक्ष श्री. रविंद्र देवाळकर यांचा वाढदिवस सोहळा आज (दि.१४) ला श्रीलीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी स्वरूपात चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांना पाचारण करण्यात आले होते.

या सोहळ्यात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे, सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, सत्कार मूर्ती रविंद्र देवाळकर, त्यांच्या धर्मपत्नी सौ. किरणताई रविंद्र देवाळकर, प्राचार्य डॉ. आशिष महातळे, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक श्री. देवानंद वाढई, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. विनोद शेतकी, मंडळ अधिकारी श्री. प्रदीप किरमे आदी उपस्थित होते.

या निमित्ताने श्री. रविंद्र देवाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अत्यंत कौटुंबिक व उत्साहवर्धक वातावरणात हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, प्राध्यापक तथा कर्मचारी वर्गातील मंडळी उपस्थित होती.

Comments