लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा येथे पीएम धनधान्य योजना व नैसर्गिक शेती अभियानांचा शुभारंभ

वरोरा येथे पीएम धनधान्य योजना व नैसर्गिक शेती अभियानांचा शुभारंभ

वरोरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व कडधान्य अभियान यांच्या शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आज वरोरा येथे पार पडले. या कार्यक्रमास आमदार करन देवतळे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे स्थळ मोहबाळा रोड येथील कृषि उत्पन्न बाजार समिती होते. शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होऊन, नैसर्गिक शेतीकडे वाटचाल होणार आहे.

शेतीचा दर्जा उंचावणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून 'आत्मनिर्भर भारत' घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

Comments