लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*जिल्हाधिका-यांकडून महिला व बालविकास विभागाचा आढावा*

*जिल्हाधिका-यांकडून महिला व बालविकास विभागाचा आढावा*

चंद्रपूर, दि. 10 : जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 10) आढावा घेतला. यात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज, ‘पोश ॲक्ट – 2013’, ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना आणि आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह योजनांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, संरक्षण अधिकारी कविता राठोड, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तारवार, आतिश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत्‍ तक्रार समिती स्थापन करावी. तसेच ती वेळोवेळी अपडेटसुध्दा करावी. ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणीबाबत महिला व बालविकास विभागाने सर्वांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे. विविध विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणा-या योजना, त्यांना मिळणारे अनुदान आदी बाबी गांभिर्याने कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

याप्रसंगी कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे, समुदेशन केंद्र, जिल्हा विधीसेवा अंतर्गत मनोधैर्य योजना, कायदेविषयक सल्ला व जनजागृती कार्यक्रम, सखी वन स्टॉप सेंटर, जिजामाता वर्किंग वुमेन होस्टेल, शक्तीसदन योजना, स्वाधार, सर्व शासकीय आस्थापनेवर अंतर्गत तक्रार समितीचे गठन, ‘शी –बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, बेटी बचाव, बेटी पढाओ, विविध योजनांमध्ये आलेले अनुदान आदींचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

Comments