लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वणा नागरीक सहकारी बँकेची नवीन शाखा माढेळी येथे सुरू

वणा नागरीक सहकारी बँकेची नवीन शाखा माढेळी येथे सुरू

वरोरा: वणा नागरीक सहकारी बँक लिमिटेड, हिंगणघाट यांच्या माढेळी येथील नवीन शाखेचे लोकार्पण सोहळा गेल्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि  लोकप्रतिनिधी च्या उपस्थितीत पार पडला. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी या शाखेचे उद्घाटन केले.
कार्यक्रमासाठी वरोरा विधानसभा आमदार श्री करण देवतळे यांचे अध्यक्षस्थानी स्वागत करण्यात आले . समारंभात इतर अनेक मान्यवर व्यक्तींनीही सहभाग दर्शविला. त्यामध्ये हिंगणघाट-समुद्रपूर विधानसभा आमदार श्री समीरजी कुणावार, माजी राज्यमंत्री श्री रणजीतदादा कांबळे तसेच हिंगणघाट विधानसभेचे माजी आमदार श्री राजूभाऊ तिमांडे यांचा समावेश होता.

या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष ॲड. सुधीरजी कोठारी यांचे मार्गदर्शन उपस्थित होते. शाखेच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री रवींद्र शिंदे, माढेळी गावाचे सरपंच श्री देवानंदजी महाजन यांसह भद्रावती आणि वरोरा परिसरातील स्थानिक प्रशासकीय आणि सहकारी क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

या नवीन शाखेमुळे माढेळी आणि आजूबाजूच्या भागातील लोकांना आता अधिक सोयीस्कर बँकिंग सेवा मिळू शकतील. बँकेच्या अध्यक्षांनी हा प्रकल्प सहकारी चळवळीतील विस्ताराचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आल्याचे सांगितले. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम  यशस्वीपणे पार पडला.






Comments