लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बोटिंग परिसरात ‘भीमा’वाघाने गाय कली ठार .



बोटिंग परिसरात  ‘भीमा’वाघाने  गाय कली ठार .

सिताराम पेठ. 

सीताराम पेठ -  केशव मडावी यांच्या गाईवर आज दिनांक २० ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारच्या सुमारास ३:०० वाजता वाघाने हल्ला केला व गाय ठार केली. ही घटना सीताराम पेठ मधील बोटिंग एरिया येथील बीट क्रमांक ९५६ मध्ये घडली. हल्ला करणाऱ्या वाघाचे नाव ‘भीमा’ असे नोंदवले आहे. स्थानिक लोक व वनखात्याच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

भीमा या वाघाचे वास्तव्य सिताराम पेठ गावामध्ये असून आजूबाजूच्या जंगलातच या वाघाचा नेहमी वावर असतो. त्यामुळे पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी जमा होतात. गावातील नागरिकांना याचा धोका असून वन विभागामार्फत लवकरात लवकर या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

Comments