लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

युवासेनाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; अनेक युवकांनी घेतला समावेश

युवासेनाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; अनेक युवकांनी घेतला समावेश

भद्रावती : शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भद्रावती येथे युवासेना व शिवसेना वतीने रविवारी  भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात युवकांनी जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश घेतला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि युवानेते खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या शिवसेना बळकटीकरणाच्या संकल्पनेनुसार असंख्य उत्साही युवकांनी धनुष्यबाण हाती घेत भद्रावती येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात आलेखभाऊ रट्टे (युवासेना जिल्हाप्रमुख) यांच्या मार्गदर्शनात व महेश जिवतोडे (युवासेना लोकसभा समन्वयक) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने युवक युवासेनेत दाखल झाले.

या वेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या उत्साहात उपस्थित राहून नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

Comments