लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा-भद्रावती विधानसभेतील नवनियुक्त मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा संपन्न

*वरोरा-भद्रावती विधानसभेतील नवनियुक्त मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा संपन्न*

*रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश*

वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नव्याने नियुक्त मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा हा कार्यक्रम वरोरा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख मा. श्री रमेशजी राजूरकर आदी माझ्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले.
        या नवप्रवेशितांमध्ये प्रमुखपणे वरोरा नगर परिषद माजी उपाध्यक्ष व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख श्री खेमराजजी कुरेकार, उपशहरप्रमुख श्री संजयजी नरोले, गौरव बोबडे, शंकर गोवारदिपे, अमोल क्षीरसागर, शाखाप्रमुख अरुण ढाकणे, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल खारकर, विठ्ठल उपरे, विलासभाऊ सपाटे तसेच इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मंचावरील मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.

Comments