लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*विजयादशमी : जिंकण्याची दुर्दम्य इच्छा भाव जागवणारा उत्सव - डॉ. सतपाल सोवळे*

*विजयादशमी :  जिंकण्याची दुर्दम्य इच्छा भाव जागवणारा उत्सव - डॉ. सतपाल सोवळे*

     
वरोडा : श्याम ठेंगडी 

आत्मविस्मृत झालेल्या समाजात चेतना फुंकण्यापासून ते आत्मभान जागृत झालेला हिंदू समाज हा शंभर वर्षाच्या अथक संघ साधनेचा परिणाम असल्याचे   प्रतिपादन भारतीय विचार मंचे विदर्भ प्रांत संयोजक डॉ.  सतपालजी सोवळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरोडा नगर शाखेच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव प्रसंगी प्रमुख  वक्ता म्हणून ते बोलत होते. 
याप्रसंगी  व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून येथील गोसेविका मिरल भुतडा, तालुका संघचालक सुनील सरोदे, नगर संघचालक मनोज रेलकर विराजमान होते.

     काल, परिस्थिती नुसार देशाचे व्यावहारिक दर्शन घडवणारा संघ विचार व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हा टप्पा गाठण्यासाठी नित्य कटिबद्ध असून पंच परिवर्तनासाठी स्वयंसेवकांनी सिद्ध रहावे असे आवाहन सतपाल सोवळे यांनी याप्रसंगी केले.  येथील कर्मवीर कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणात ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता हा विजयादशमी उत्सव कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी ४ वाजता शहरातून गणवेशधारी स्वयंसेवकांचे भव्य पथसंचलन काढण्यात आले.
        करुणा आणि सेवा हा सर्वश्रेष्ठ धर्म असून गोमाता ही संपूर्ण जीवनाचा आधार असल्याचे मत प्रमुख अतिथी भुतडा यांनी यावेळी व्यक्त करत हिंदू एकजूट  राहिला तरच समाज, संस्कृती आणि राष्ट्राची प्रगती व सुरक्षा कायम राहील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
याप्रसंगी स्वयसेवकांनी सामूहिक समता, दंडयोग, व्यायामयोग, घोष वादन यांची प्रात्यक्षिके सादर केली.
     संघाच्या गणवेश धारी स्वयंसेवकाचे शहरातून निघालेले पथसंचलन व संपूर्ण कार्यक्रमात आमदार करण देवतळे संपूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. आमदार आणि तेही संपूर्ण गणवेशात सहभागी होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे हे विशेष.
नगर कार्यवाह अंकित तेलासे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला मनीष दसरिया याने अमृत वचन तर सौरभ भागडे यांनी सुभाषित सादर केले
 अखिलेश द्रविड यांनी "शून्य से एक शतक बनते" हे वैयक्तिक गीत  सादर केले. कार्यक्रमाला गणमान्य नागरिक व माता भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


*********

Comments