लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगरांचा रास्ता रोको*

*धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगरांचा रास्ता रोको*

वरोरा :  वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे  चंद्रपूरला -नागपूर महामार्गांवर मुख्य मागणी  धनगर आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजेत  याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

धनगर नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धनगर समाजाची आरक्षण ची अंमलबजावणी करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गा मध्ये समाविष्ट करणे, शेळ्या मेंढयाना चराईसाठी वनविभाग आरक्षित जागा देणे, अहिल्यादेवी होळकर महामेष योजना चालु करणे, यशवंतराव घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अश्या विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलनात टेमुर्डा येथे हजारो च्यासंख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरले होतें. या दरम्यान  रस्त्यावर बसून यळकोट यळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घोषणाबाजी करून काही वेळ चक्कजाम केला होता . 
         यावेळी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करून धनगर योजनेचा लाभ समाजाला मिळाला पाहिजेत. 
आरक्षण अंमलबजावणी झाली नाही. तर सरकारच्या मागे धनगर समाज कधीच उभा राहणार नाही. या आंदोलनाचे ने्तृत्व आयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  उत्सव समिती, धनगर समाज महासंघ, धनगर जमत संघटना, धनगर कर्मचारी संघटना, मल्हार सेना, अहिल्यावहिनी महिला सेना यांनी केले होतें. या आंदोलनात हजारो धनगर समाज उपस्थित होतें.

Comments