लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बरांज खुल्या कोळसा खाणीतील कामगारांचे दिवाळी बोनससाठी आंदोलन; खाण काम बंद .

बरांज खुल्या कोळसा खाणीतील कामगारांचे दिवाळी बोनससाठी आंदोलन; खाण काम बंद .

भद्रावती : कर्नाटका एमटा येथील खुल्या कोळसा खाणीतील कामगारांना  दिवाळी बोनस मिळाला नसल्याने गुरुवारी (१६ ऑक्टोबर) कामगारांनी मोठ्या संख्येने आंदोलन करून खाणीचे काम बंद पाडले. यामुळे बरांज खुली कोळसा खान पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बी.एम.पी.एल. (BMPL) कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या या खाणीतील कामगारांना नियमानुसार वेतनाबरोबर वार्षिक दिवाळी बोनस देणे बंधनकारक आहे. कंपनीने १९ सप्टेंबर २०२५ रोजी बोनसबाबत ‘रिसर पत्र’ काढून कामगारांना लवकरच बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळी अगदीच जवळ आली असतानाही कामगारांच्या खात्यात बोनस जमा झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर उलगुलान खान कामगार संघटनेच्या वतीने आज संतप्त कामगारांनी अचानक खाणीचे संपूर्ण काम बंद केले. सकाळपासूनच कामगारांनी प्रवेशद्वारावर ‘बोनस द्या – नाहीतर खान बंद करा!’ अशा घोषणा देत घोषणाबाजी सुरू केली.

या घडामोडीची माहिती मिळताच कंपनी व्यवस्थापनाने भद्रावती पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना हटविण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगारांनी ठाम भूमिका घेतली. अखेर कामगारांनी केपीसीएल (KPCL) कार्यालयाकडे मोर्चा वळवत भद्रावती येथील केपीसीएल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे बरांज परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

संघटनेचे नेते अरविंद देवगडे, पांडुरंग सातपुते, सुभाष गेडाम, विनोद आगलावे, महेश पेटकर, शंकर बाडपणे, मारुती खंडाळकर, रवींद्र निखाडे, महेंद्र नवघरे यांसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.


******

Comments